नमस्कार मित्रांनो जनावरांच्या गोठ्यांना मान्यता देण्यात आली असून त्यासाठी पशूपालकांना अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात त्यातील एक योजना म्हणजे मागेल त्याला गोठे आहे या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे त्यासाठी 560 गोठ्यांना मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून गोठ्यांच्या निर्मितीसाठी 4 कोटी 31 लाख निधी देण्यात येणार आहे एक गोठ्यासाठी 77 हजार एक लभार्थीला मिळणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती खाली पाहूया.
हे देखील वाचा : शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी करा अर्ज 25 लाख सबसीडी
जनावरांच्या गोठ्यांना मान्यता पशूपालकांना होणार लाभ
ग्रामीण भागामध्ये जनावरांना अबडधोबड बांधलेल्या अवस्थेत गोठ्यात ठेवले जाते या गोठ्यातच मोठ्या प्रमाणात जनवारांचे शेषू, मूत्र पडलेले असते.
पावसाच्या दिवसात गोठयातील जागा ही दलदलीत होते त्यामुळे या जागेवर जनावरांना बसता येत नाही आणि बसले तरी चिखलाने पूर्ण अंग भिजते.
याचा जनावरांच्या शरीरावर परिणाम होऊन जनावरांना आजार होतो. त्यामुळे त्यांना दवाखान्यात घेऊन जावे लागते अनेकदा ही आजार जनावरांच्या जिवावर बेततात.
चिखल झालेल्या ठिकाणी दावणी नसल्याने चारा टाकला असता तो चिखलात मळला जातो व भिजतो. त्यामुळे जनावरांना तो चारा खाता येत नाही.
या सर्व बाबीचा विचार करून शासनाने शेतकरी पशूपालकांसाठी गोठ्याची योजना सुरू केली आहे आणि जनावरांच्या गोठ्यांना मान्यता देण्यात आली आहे.
गोठ्यासाठी खालील प्रमाणे मिळणार अनुदान
मागेल त्या शेतकऱ्यांना गोठे अनुदान दिले जाणार आहे त्यानुसार 560 गोठ्यांना मंजूरी देण्यात आली आहे यातील 10 गोठ्याचे कामे प्रगतीपथावर आहे
- एक गोठ्यासाठी 77 हजार 288 रुपये दोन टप्प्यात देण्यात येतील.
- ज्या पशूपालकाकडे 2 ते 6 जनावरे आहे त्यांना 77 रुपये देण्यात येतील.
- तसेच 6 ते 12 जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन गोठ्यांचा लाभ दिल जाईल.
- आणि 12 ते 18 जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन गोठ्यांचा लाभ दिल जाणार आहे.
या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
रोजगार हमी योजनेंतर्गत मिळणार लाभ
महाराष्ट्र ग्रामीण गोंजागर हमी योजनेंतर्गत फुलंब्री तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे
पशूपालक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी शासनाने
मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध या वाक्यावर चंगळे गोठे बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा