पिठाची गिरणी अनुदान योजना सुरु असा करा ऑनलाईन अर्ज

पिठाची गिरणी अनुदान योजना सुरु झालेली आहे. free flour mill scheme in maharashtra. जाणून घेवूयात या योजनेसंबधी अधिक माहिती सविस्तरपणे.

ग्रामीण भागामध्ये पीठ दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर जावे लागते. ग्रामीण भागामध्ये अनेक महिलांना खूप कष्टाची कामे करावी लागतात. दिवसभर शेतात राबवून संध्याकाळी दळण दळण्यासाठी गिरणीवर जावे लागते. अशावेळी तुमच्या घरी मिनी म्हणजेच छोटी पिठाची गिरणी असेल तर नक्कीच सोयीचे होते.

सध्या पिठाची गिरणी अनुदान योजना सुरु झालेली आहे. तुम्हाला जर शासकीय अनुदानावर पिठाची गिरणी हवी असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून द्या.

जिल्हा परिषद योजना 2022 अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे. हि योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविली जात आहे.

या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत कि पिठाची गिरणी योजना pithachi chakki yojana साठी कोणत्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

अर्ज कसा करावा लगतो. कोणकोणती कागदपत्रे लागतात. हि सर्व माहिती काळजीपूर्वक पहा जेणे करून तुम्हाला तुमचा स्वतःचा पिठाच्या गिरणीसाठी अर्ज करता येईल.

हे देखील वाचा : शेतकऱ्यांना १ हजार ८६८ कोटी नुकसान भरपाई वितरित

पिठाची गिरणीसाठी अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत.

खालील पद्धतीचा अवलंब केल्यास पिठाच्या गिरणीसाठी ऑनलाईन अर्ज करणे सोपे जाते.

  • तुमच्या कॉम्प्युटरमधील वेबब्राउजर ओपन करा.
  • गुगलच्या सर्च बारमध्ये jalna zp yojana असा कीवर्ड टाका.
  • त्यानंतर जालना जिल्हा परिषद योजना वेबसाईट तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होईल.
  • वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवरील विभाग या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर समाज कल्याण या पर्यायावर क्लिक करा.

खालील योजनांचा मिळेल लाभ

जसे हि तुम्ही समाज कल्याण या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी विविध त्यावेळी विविध योजना तुमच्या स्क्रीनवर दिसेल. योजनांची यादी खालीलप्रमाणे असेल.

  • मिरची कांडप यंत्र
  • शेतकरी बांधवांसाठी तुषार संच.
  • पाण्यातील 5 HP विद्यत मोटार.
  • झेरॉक्स मशीन.
  • पिठाची गिरणी.
  • दिव्यांगाना झेरॉक्स मशीन.
  • अपंग व्यक्तीसाठी सायकल.
  • मिनी पिठाची गिरणी पुरविणे.

जालना जिल्हा परिषद वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment