नुकसान भरपाई अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी हे काम न केल्यास राहतील मदतीपासून वंचित

शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंद न केल्यास शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांना तोंड देण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोंद न केल्यास शासनाच्या विविध योजना, नुकसान भरपाई अनुदान, आपत्ती संबंधी मिळणाऱ्या अर्थसहाय्याला शेतकऱ्यांना मुकावे लागण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे.

ई पीक पाहणीची नोंद न केल्यास शेत पडीक किंवा पेरणी झालीच नाही, असे गृहीत धरण्यात येईल. पुढील हंगामाकरिता कोणत्याही बँकेकडून पीककर्ज घेताना अडचणी निर्माण होतील. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही. जर शासनाद्वारे एखाद्या पिकाला आर्थिक मदत जाहीर केली, तर त्यापासूनही वंचित राहावे लागेल. शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केल्यास त्याचीही नुकसान भरपाई मिळू शकणार नाही.

अॅपद्वारे त्यामध्ये पीक पेरा भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. अॅपमध्ये नोंदविलेला पीक पेरा थेट सातबारावर येणार आहे. त्यामुळे योजनांचा लाभ मिळण्यासाठी याची मदत होणार आहे. या अॅपद्वारे शेतातील पिकांची नोंद स्वतः शेतकऱ्यास शेतात जाऊन करावयाची आहे. तसे न केल्यास आपला सातबारा कोरा राहू शकतो. नुकसान भरपाई अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी हे काम न केल्यास राहतील मदतीपासून वंचित

परिणामी, सरकारकडून मिळणारी मदत, पीक विमा, पीक कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होणार आहेत.. शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या पीक पाहणी संबंधी ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ या संकल्पने नुसार ई- पीक पाहणी अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अॅपद्वारे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती स्वतः भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अॅपद्वारे एका अॅण्ड्रॉइड मोबाइलवर २० खातेदारांची पीक पाहणी भरता येऊ शकते.

  • भूम तालुक्यातील ४६९७५ शेतकऱ्यांनी अद्यापही ईपीक पाहणी केलेली नाही
  • भूम तालुक्यातील शेतकरी खातेदारांची एकूण संख्या – ६६१३८
  • ई – पीक पाहणी केलेले खातेदार संख्या – १९१६३
  • सर्वसाधारण पेरणी क्षेत्र – ५४००७
  • पीक पाहणी झालेले एकूण शेती क्षेत्र – २५९७१ हेक्टर

Leave a Comment