Ladki Bahin Yojana : उरले फक्त इतकेच दिवस, तिसरा हप्ता कधी येणार खात्यात?

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता तिसरा हप्ता जमा होणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे आता महिलांची प्रतिक्षा संपणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता येणार आहे? आणि तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे येणार आहेत? हे जाणून घेऊयात.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्ताचे पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे. 

थेट 4500 खात्यात येणार?

26 सप्टेंबर पर्यंत या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार यादीत नाव पहाआता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे. आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे. त्या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. Ladki Bahin Yojana

या’ महिलांना फक्त सप्टेंबरचा लाभ मिळणार

ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत. त्याच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीयेत. कारण सरकारने आता ज्या महिन्यापासून महिला अर्ज करणार आहेत, त्या महिन्यापासून महिलांना पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना ऑक्टोबरमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान अशाप्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे.हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे. Ladki Bahin Yojana

Leave a Comment