PM Kisan Samman Nidhi Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येत्या पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार आहे. २०१९ साली सुरु झालेल्या या योजनेचा येणारा १८ वा हप्ता असणार आहे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षातून तीनवेळा प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण सहा हजार रुपये दिले जातात. योजनेतंर्गत मिळणारा निधी पाच ऑक्टोबर रोजी थेट बँक खात्यात वर्ग केला जाईल, अशी माहिती ‘पीएम किसान’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम किसान योजनेचा १७ व्या हप्ता १८ जून मंगळवारी वाराणसी येथे वितरण केला होता. देशातील ९.२६ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रक्कम पाठवण्यात आले होते. दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे अजूनही जमा झाले नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी तर काहींना अडचणी येत आहेत. कारण अनेकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन केवायसी करून घेणे गरजेचे आहे. ऑनलाईन केवायसी पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन (pmkisan.gov.in) वर करता येईल. PM Kisan Samman Nidhi Yojana
पीएम किसानचे पैसे जमा झाले की, नाही याची माहिती घेण्यासाठी pmkisan.gov.in वर जाऊन फार्मर कॉर्नर या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करून राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून ‘गेट रिपोर्ट’वर क्लिक करा. तुम्हाला सर्व माहिती येथे मिळेल.
पीएम किसानचे पैसे जमा झाले नसतील तर तक्रार करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर तक्रार दाखल करू शकता. त्यासाठी हेल्प डेस्क या ऑप्शनला क्लिक करा. तिथं आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाइल नंबर द्या. त्यानंतर डिटेल्स ऑप्शनवर क्लिक करा. क्वेरीचा अर्ज मिळेल. त्यामध्ये आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाइल नंबर द्या. समस्या काय आहे ते नमूद करा. आणि सबमिट करा.
किंवा तुम्ही 0120-6025109, 011-24300606 वर किंवा 155261 या नंबरवर तक्रार करू शकता. तसेच [email protected] ईमेल वर मेल करू शकता.