या १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई यादीत नाव पहा

राज्यातील १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे हि भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

यंदा राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस पिकासह अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईची मागणी सरकारकडे करत होते. आता नुकतीच राज्य सरकारकडून नुकसान भरपाईसाठीच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय २३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत महा डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

कोणत्या १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे त्या संदर्भात शासने २३/९/२०२४ रोजी जी.आर काढला आहे व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे त्या संदर्भात यादी देखील प्रकाशित करण्यात आली आहे.

आपण खाली कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकर्यान मदत मिळणार आहे त्याची यादी पाहणार आहोत.

यादी पहा

  • गडवचरोली
  • वधा
  • चंदपूर
  • नागपूर
  • पुणे
  • सातारा
  • सांगली
  • अमरावती
  • अकोला
  • यवतमाळ
  • बुलढाणा
  • वाशीम

या जिल्ह्याचा अतिवृष्टी नुकसान भरपाईत समावेश करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी जी.आर पहा

Leave a Comment