kapus soyabin anudan राज्य शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादकांना जाहीर केलेल्या अर्थसाह्य योजनेअंतर्गत शुक्रवारपर्यंत (ता. २७) हिंगोलीतील २ लाख ४० हजार २० शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले होते. तर १ लाख ६३ हजार ५६१ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित होते.
उर्वरित शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले. गतवर्षी (२०२३) बाजारभाव कमी झाल्यामुळे कापूस व उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याबद्दल राज्य शासनाकडून खरिपातील ई-पीकपाहणी पोर्टलवर नोंद असलेल्या कपाशी व सोयाबीनच्या क्षेत्रानुसार परिगणना करून अर्थसाह्य देण्यात येणार आहे.
२० गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार रुपये, तर २० गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये अर्थसाह्य २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या www.scagridbt.mahait.org.in वेबपोर्टलवर माहिती भरली जात आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये एकूण १६८ कृषी सहायक आहेत. कापूस उत्पादक ३७ हजार ९६ व सोयाबीन उत्पादक ३ लाख ६६ हजार ४६० मिळून एकूण ४ लाख ३ हजार ५५६ शेतकरी आहेत. त्यापैकी ३ लाख ३ हजार ५५९ शेतकऱ्यांची (७५.२२ टक्के) माहिती भरणे पूर्ण झाले. पात्र लाभार्थ्यांच्या आधारक्रमांक संलग्न बँक खात्यांत अर्थसाह्याची रक्कम जमा होते याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. kapus soyabin anudan
हिंगोली जिल्हा कापूस, सोयाबीन अर्थसाह्य स्थिती
तालुका ई-केवायसी पूर्ण ई-केवायसी प्रलंबित
- हिंगोली ४८२१५ ३७१६७
- कळमनुरी ४२६२४ ३५२१२
- वसमत ५०८५८ ३०८४५
- औंढा नागनाथ ३८२६३ २६१९८
- सेनगाव ६००६० ३४१२९