nuksan bharpai सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळपिकांना फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून २ लाख ५७ हजार ३०५ बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २३४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना सादर केला असून मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातील प्राप्त अहवाल एकत्रित करुन नुकसानभरपाईसाठी निधी मागणी अहवाल शासनाकडे सादर होईल. अतिवृष्टीमुळे १ लाख ४६ हजार ८३८ हेक्टरवरील जिरायती क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले. यासह २२ हेक्टरवरील बागायत तर ९ हजार ५६८ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला.
एकूण १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. जिरायत क्षेत्रातील नुकसानभरपाईसाठी १९९ कोटी ७० लाख रुपये, बागायत क्षेत्रासाठी ५ लाख ९४ हजार रुपये तर फळपीक क्षेत्रासाठी ३४ कोटी ४४ लाख ७६ हजार ४४० रुपयांचा निधीची गरज असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. nuksan bharpai
तालुका – बाधित शेतकरी – बाधित क्षेत्र – अपेक्षित निधी
छत्रपती संभाजीनगर – ५०४९ – ४२९६.७९ – १५ कोटी
पैठण – ९४१५५ – ५०७९० – ७१ कोटी
फुलंब्री – १०५ – ६९.०७ – ९३ लाख
गंगापूर – ३०७६१ – २२४८९ – ३१ कोटी
खुलताबाद – १२५५१ – ८३४६ – ११ कोटी
सिल्लोड – ७९१२० – ५०१४७ – ६८ कोटी
कन्नड – २५७६ – ८०२ – ११कोटी
सोयगाव – ३२९८८ – १९४८९.१७ – २६ कोटी
एकूण – २५७३०५ – १५६४२९.०३ – २३४ कोटी