आता घरी बसून ऑनलाईन सातबारा करा दुरुस्ती .
शेतकऱ्यांसाठी सातबारा हा खूप महत्वाचा असतो जर या सातबाऱ्यामध्ये काही चूक झाली तर मोठी समस्या असते कारण आपल्या परिवारामध्ये कोणाकडे किती जामीन आहे ही सर्व माहिती आपल्या सातबाऱ्यामध्ये असते.
जर तुम्हालाही सातबारा दुरुस्त करायचा असेल तर बाहेर तुम्हाला काही पैसे सुद्धा खर्च करावे लागतात पण आता तुम्ही तूमच्या मोबाईलच्या मदतीने सुद्धा हा सातबारा ऑनलाइन दुरुस्त करू शकता.
ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे जर तुमच्या सातबाऱ्यामध्ये काही चूक झालेली असेल तर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने दुरुस्ती कारू शकता. बघा कशी कराची सातबारा दुरुस्ती ऑनलाई.
जर तुम्हाला तुमचा सातबारा दुरुस्त करायचा असेल तर यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमचा हस्तलिखित सातबारा हा उपलोड करावा लागणार आहे हा सताबरा कोणत्या websaite उपलोड करायचा आणी कसा करायचा ही सर्व माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
या वेबसाईटवर करा ऑनलाईन सातबारा दुरुस्ती
जर तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यातील चुक दुरुस्त करायची असेल तर यासाठी तुम्हाला तुमचा जुना सातबारा काढावा लागणार आहे हा सातबारा काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार आहे.
सातबारा दुरुस्ती करण्याची दुसरी स्टेप म्हणजे आता तुम्हला यासाठी सातबारा दुरुस्ती अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करण्यासाठी तुमाला https://bhulekh.mahabhumi.gov.in/ websaite वर जायचे आहे.
या websaite वर आल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकून login या बटनावर क्लिक करायचे आहे.
login झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भरपूर पर्याय दिसेल पण तुम्हाला 7/12 Mutations या पर्यायवर क्लिक करयचे आहे त्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारण्यात येईल ती योग्य प्रकारे भरा.
ही सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला आता तुमचा जिल्हा, तालुका आणी गाव निवडायचे आहे आणी सबमिट या पर्यावर क्लिक करायचे आहे.
आता पुन्हा तुम्हाल काही पर्याय दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुम्हाला तुमच्या साताबाऱ्या संदर्भात माहिती भरायची आहे. जी माहिती तुम्ही भरणार आहात ती योग्य असेल याची खात्री करा.
आता तुम्हाला तुमचा ८ अ चा क्रमांक टाकून खातेदार निवडा या बटनावर टच करायचे आहे. आता तुम्हाला तुमच्या जमिनीची तपशील दिसेल.
आता परत तुम्हला काही पर्याय दिसेल हे पर्याय म्हणजेच तुम्हाला काय दुरुस्त करायचे आहे. जसे की क्षेत्र दुरुस्ती, नावातील दुरुस्ती आणी इतर बरेच काही.
अश्या प्रकारे तुम्ही तुमचा सातबारा हा online दुरुस्त करू शकता.