मिनी ट्रॅक्टर योजना 2025 अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिनी ट्रॅक्टरसाठी पात्र लाभार्थींना ९० टक्के अनुदान दिले जाते. उर्वरित १० टक्के लाभार्थी हिस्सा अर्जदारास स्वतः भरावा लागतो.
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र आहेत किती अनुदान मिळते कोणते कागदपत्रे आवश्यक असतात अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे आणि अर्ज कोणत्या जिल्ह्यासाठी सुरु आहेत या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात.
मिनी ट्रॅक्टर योजना 2025 अनुदान व पात्रता
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी ९० टक्के म्हणजेच ३ लाख १५ हजार एवढे अनुदान दिले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे.
या योजनेचा लाभ बचत गटांना म्हणजेच स्वयंसहाय्यता गटांना देण्यात येतो.
स्वयंसहाय्यता गटामध्ये कमीत कमी ८० टक्के सदस्य हे नवबौद्ध व अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.
मिनी ट्रॅक्टर खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा ३ लाख ५० हजार रुपये आहे.
कोठे कराल अर्ज करण्याची शेवटची तारीख
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय असते. या ठिकाणी मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज सादर करता येतो.
संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये हि योजना लागू असली तरी काही ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची तारीख मागे पुढे होऊ शकते.
सध्या नांदेड जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५ हि आहे.
अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंट आहे अर्ज सादर करतांना अपलोड केलेल्या कागदपत्राची झेरॉक्स संबधित कार्यालयात सादर करावे.
शेतीमध्ये मिनी ट्रॅक्टरची उपयुक्तता
शेतीमध्ये आधुनिकता आल्याने आता अनेक कामे मिनी ट्रॅक्टरच्या सहाय्यने केली जात आहे. नांगरणी वखरणी कोळपणी इत्यादी कामे आता मिनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात आहे.
शेतीमधील छोटी छोटी कामे करण्यासाठी आता मिनी मिनी ट्रॅक्टरची मदत होत असल्याने अनेक शेतकरी हा मिनी मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यास इच्छुक दिसत आहे.
आता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ९० टक्के अनुदान देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना
हा मिनी ट्रॅक्टर खरेदी करणे अधिक सोपे झाले आहे.
सध्या नांदेड जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून १० फेब्रुवारी २०२५ च्या आत इच्छुकांनी
ऑनलाईन अर्ज सादर करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.