मित्रांनो आज आपण या खालील लेखात मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. जसे की या योजनेसाठी पात्रता काय आहे? अर्ज कुठे आणि कसा करायचा? कागदपत्रे काय लागतील? असली सर्व माहिती आपण आज जाणून घेऊया.
या योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहे पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे त्यासाठी अर्ज ऑफलाइन आहे किंवा ऑनलाइन अर्ज कसा करावा या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.
आपल्या राज्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवा असा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे राज्यातील महिला या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
मोफत पिठाची गिरणी योजना
पिठाची गिरणी योजना ही महिला बाल विकास विभागाच्या मार्फत राबविली जाणारी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना लाभ दिल जाणार आहे. योजनेच्या माध्यमातून लाभयार्थ्याना 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे त्यासाठी अर्ज करणे सुरू झाले आहे
या योजनेसाठी अर्ज करून तुम्ही पिठाच्या गिरणीचा लाभ घेऊ शकता.
योजनेंतर्गत राज्यातील महिला मोफत पिठाची गिरणी मिळून घरबसल्या चांगल्या प्रकारे व्यवसाय करून पैसे कामवू शकतात
मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज.
- अर्जदार ही १२ वी शिकलेली असल्याचा पुरावा.
- अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स.
- घराचा ८अ उतारा
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख २० हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा (तहसीलदार कडून किंवा तलाठी कडून)
- बँक पासबुक झेरॉक्स.
- लाईट बिलची झेरॉक्स.
योजनेसाठी पात्रता
या योजनेचा लाभ हा १८ ते ६० वयोगटातील मुली व महिलांना मिळेल.
तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये ज्या महिला अनुसूचित जमाती मधील आहे आशा महिलाना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
असा करा अर्ज
जिल्हा परिषद महिला व बाल विकास समिति मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. आता हे अर्ज करणे सुरू आहे तुम्हाला विहित नमुन्यात अर्ज पंचायत समितीमध्ये दाखल करायचा आहे.
अर्ज नमूना PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा