नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किती नुकसान भरपाई मिळणार, २ हेक्टर पर्यंत कि 3 हेक्टरपर्यंत..

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किती नुकसान भरपाई मिळणार आहे व किती हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

मागच्या आठ दिवसांमध्ये मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात पावसाने नुकसान केले. या नुकसानीचे पंचनामेही अंतिम टप्प्यात आहेत. पण आता सरकार नव्या निकषानुसार भरपाई देणार की जुन्या निकषानुसार भरपाई देणार? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पण जोपर्यंत सरकार नव्या निकषानुसार भरपाई जाहीर करत नाही तोपर्यंत जुन्या निकषानुसार म्हणजेच कमी नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर सरकार वाढीव दराने भरपाई देऊ शकते, अशी माहीती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सरकारने नोव्हेंबर २०२३ आणि त्यापुढच्या काळात झालेल्या पीक नुकसानीसाठी वाढीव मदत देण्याबाबतचा जीआर म्हणजेच शासन आदेश १ जानेवारी २०२४ रोजी काढला होता. या जीआरमध्ये म्हटले होते की, नोव्हेंबर २०२३ आणि त्यापुढील काळात अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव भरपाई देण्यात येईल, असे म्हटले होते. म्हणजेच एनडीआऱएफच्या मदतीपेक्षा जास्त भरपाई राज्य सरकारने जाहीर केली होती.

सरकारने नोव्हेंबर २०२३ आणि त्यापुढच्या काळात झालेल्या पीक नुकसानीसाठी वाढीव मदत देण्याबाबतचा जीआर म्हणजेच शासन आदेश १ जानेवारी २०२४ रोजी काढला होता. या जीआरमध्ये म्हटले होते की, नोव्हेंबर २०२३ आणि त्यापुढील काळात अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव भरपाई देण्यात येईल, असे म्हटले होते. म्हणजेच एनडीआऱएफच्या मदतीपेक्षा जास्त भरपाई राज्य सरकारने जाहीर केली होती.

सरकारने भरपाईसाठी क्षेत्र मर्यादाही वाढवली होती. जुन्या निकषानुसार २ हेक्टरपर्यंतच भरपाई मिळत होती. पण सरकारने भरपाईची मर्यादा २ हेक्टरवरून ३ हेक्टर केली. म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत भरपाई मिळेल, असे सरकारने त्यावेळी स्पष्ट केले होते.

पण अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, त्यांना ३ हेक्टर नाही तर २ हेक्टरच्या मर्यादेतच भरपाई मिळाली होती. तसेच सरकारने जीआरमध्ये म्हटले होते की नोव्हेंबर २०२३ आणि त्यापुढच्या काळात झालेल्या पीक नुकसानीसाठी वाढीव दराने भरपाई दिली जाईल. तसेच हा जीआर १ जानेवारी रोजी काढला होता. म्हणजेच १ जानेवारीपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी हा जीआर लागू होता. त्यापुढच्या नुकसान भरपाईविषयीसाठी हा जीआर लागू पडणार नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किती नुकसान भरपाई मिळणार, २ हेक्टर पर्यंत कि 3 हेक्टरपर्यंत..

म्हणजेच जर सरकारने नवा जाआऱ काढून वाढीव दराने भरपाई देण्याचा निर्णय घेतला नाही तर शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसारच भरपाई मिळेल. मग एनडीआऱएफची भरपाई किती आहे? तर एनडीआऱएफच्या निकषानुसार २ हेक्टरपर्यंतच भरपाई मिळते. हेक्टरी भरपाईचा विचार केला तर कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी १७ हजार रुपये आणि फळपिकांसाठी २२ हजार ५०० रुपये भरपाई मिळेल.

पण मागच्या नुकसानीच्या वेळी राज्य सरकारने वाढीव भरपाई जाहीर केली होती. आताही सरकारने वाढीव भरपाई जाहीर केल्यास शेतकऱ्यांना ३ हेक्टरच्या मर्यादेत कोरडवाहू पिकांसाठी १३ हजार ६०० रुपये, बागायती पिकांसाठी २७ हजार आणि फळपिकांसाठी ३६ हजार रुपयांची भरपाई मिळू शकते. पण त्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा लागेल.

Leave a Comment