शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांनी ई केवायसी करून देखील मिळत नसल्याचे समोर आले आहे

याबाबत शासनाने दाखल घेत सोमवारी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा करण्यात आले आहे. त्यामुळे बळीराजा काही अडचणीवर मात करू शकला आहे.

महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना २०२३-२४ मध्ये झालेल्या नुकसानीचे अनुदान जाहीर केले आहे .

अंबड तालुक्यात जीरायतीसाठी हेक्टरी ८५०० हजार रुपये, तर फळबागसाठी २२५०० रुपये देण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यात जिरायतीसाठी १३६०० रुपये तर फळबागासाठी १६००० रुपये अनुदान शासनाने जाहीर केले आहे.

त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना ई केवायसी करणे आवश्यक आहे असे असतानाही शेतकऱ्यांनी सीएसी केंद्रावर जाऊन ई केवायसी केली आहे.

परंतु १० मी पासून अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान प्राप्त झाले नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी हैराण आहे.

शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घ्यायचा असले तर ई केवायसी करणे आवश्यक आहे त्यामुळे शासनाने सांगितलेल्या संकेतस्थळावर जाणून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घ्यावा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment