nuksan bharpai राज्य सरकारने २०२२ च्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ६१ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीचं वाटप राज्यातील चार जिल्ह्यात करण्यात येणार आहे. यामध्ये अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी (ता.१०) निर्गमित केला आहे. त्यामुळे चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे.
यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात २५ कोटी ७४ लाख रुपये, परभणी जिल्ह्यासाठी २१ कोटी २९ लाख रुपये, अमरावती जिल्ह्यासाठी १३ कोटी २० लाख रुपये आणि वाशिम जिल्ह्यासाठी ६९ लाख रुपये निधी वितरणाला मंजूरी देण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी जादाच्या निधीची आवशीतका असल्याचं शासनला कळवलं होतं. त्यानुसार जादाच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. nuksan bharpai
२०२२ मध्ये पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं होतं. राज्य सरकारने त्यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दर आणि निकषानुसार १ हजार ५०० कोटीच्या निधीला मंजूरी दिली होती. त्यानंतर मंजूर निधीपेक्षा जादा निधीची गरज असेल अशा जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या होत्या, त्यानुसार अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त निधीची मागणी केली होती. या मागणीनुसार राज्य सरकारनं चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६१ कोटी रुपयांच्या निधीसाठी मंजूरी दिली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने २ हेक्टरच्या मर्यादेत निधी वितरित करण्याचा स्पष्ट उल्लेख शासन निर्णयात केला आहे. तसेच लाभार्थीच्या मदतीचे वाटप पूर्ण झाल्यानंतर यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत. तर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात वा वसूलीसाठी वळती करू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना देण्याचे निर्देश दिले आहेत. nuksan bharpai