शनिवारपासून म्हणजेच ५ ऑक्टोबरपासून पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरवात होणार आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची पीएम किसान योजनेच्या यादीतून नावे काढून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे आपलं नाव या यादीत आहे की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना सध्या पडत आहे. मग पीएम किसानचा १८ वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे की नाही, हे कसं चेक करायचं याची माहिती जणून घेऊया.
पीएम किसान सन्मान निधीच वितरण ५ ऑक्टोबर रोजी वाशीम जिल्ह्यातून प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता कि मला १८ वा हप्ता मिळणार कि नाही. शेतकऱ्यांना पीएम किसानचा १८ वा हप्ता मिळणार कि नाही हे कस चेक करायचं त्याची माहिती जाणून घेऊया.
तुम्ही जर यशस्वीरित्या ई केवायसी केली असेल तर तुम्ही अगदी सोप्या १८ वा हप्ता मिळणार कि नाही हे चेक करू शकता.
असे करा चेक
- सर्वात पहिले तुमच्या मोबाईल मध्ये क्रोम ओपन करा त्यामध्ये pfms असे सर्च करा किंवा येथे क्लिक करा.
- आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर नवीन वेबसाईट ओपन होईल
- यामध्ये वरती दिलेल्या payment status मध्ये dbt status trackar क्लिक करा आता एक नवीन पेज ओपन होईल.
- त्यामध्ये आता pm kisan सर्च करा त्यानंतर खालच्या कप्प्यात तुमचा नोंदणी क्रमांक टाका.
- dbt status मध्ये payment या ऑप्शन ला सिलेक्ट करा. त्यानंतर कॅपच्या टाकून सर्च करा
अशा प्रकारे तुम्हला १८ वा हप्ता मिळणार कि नाही तुम्ही तपासू शकता.