अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी २२ कोटी ३३ लाख अनुदान मंजूर, लवकरच बँक खात्यात पैसे जमा होणार. Crop Loss

Crop Loss यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे तालुक्यातील ४७ गावांमधील २६ हजार ५९३ शेतकऱ्यांचे १६ हजार ४२३.९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी शासनाकडून २२ कोटी ३३ लाख ७५ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.

लवकरच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली. यंदा सततच्या पावसाने तसेच ढगफुटीसदृश पावसामुळे तालुक्यातील खरीप पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता.

या नुकसानीची त्यावेळी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी पाहणी केली होती. जिल्हा व तालुकास्तरीय प्रशासकीय अधिकारी, महसूल, कृषी विभागानेदेखील पाहणी करून शासनाकडे नुकसानीचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार हे अनुदान प्राप्त झाले असून, त्याचे लवकरच वाटप केले जाणार आहे. Crop Loss

अनुदानाची रक्कम वाटपासाठी तहसील कार्यालयामार्फत कार्यवाही चालू असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम टाकण्याची कारवाई तत्काळ सुरू करण्यात येणार आहे, असे तहसिलदार राजेश लांडगे, नायब तहसीलदार प्रकाश कुडदे व संतोष गुट्टे यांनी सांगितले.

Leave a Comment